खंत
मागच्या आठवड्यात सैराट पाहीला...अनेक गोष्टींनी मनावर परिणाम केला...पण एक खंत ..खंतच मनायला हवी..आपण सगळे शिकलो...कामाधंद्याला लागलो..कुणी डाॕक्टर..कुणी ईंजीनिअर..कुणी व्यापारी..कुणी सरकारी नौकरी...काहीजण परदेशात पण गेले..जाउन आले...पण कुणी नागराज मंजुळे नाही झाला आपल्या आसपास, किंवा आपल्यालाही नाही होता आलं ....अवघड मार्गाने कुणी यश मिळवायचा प्रयत्न देखील नाही केला..कदाचित आपल्याला या क्षेत्रात वा कुठल्याही creative क्षेत्रात काहीच करता येउ नये...मिळवलेल्या गोष्टींचे मोल कमी नाही...पण काही अनमोल अस आपल्याला मीळवताच येणार नाही का? कधीच नाही...ही खंत राहिलीच ना...!
आता कोणी तरी म्हणेल , जे आहोत ते काही कमी नाही. पण असं स्वतःचे समाधान करुन घ्यायची गरज नाही...सगळीकडे एकच सत्य .." बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल.." ...कर्तुत्व हे जगासमोर येउन प्रमाणीत झाल तरच त्याला मान्यता मिळते...अन्यथा कुणी कितीही ढोल बडवले तरीही त्याचा काही उपयोग नसतो...
मुद्दा यश कि अपयश हा नाही...मुद्दा प्रयत्न ..विचार ..यांचा आहे...आपण सुशिक्षित गुर ढोर आहोत ...अस आपल्या पैकी बरेच खाजगीत बोलुन दाखवतात...खर आहे का ते?
माझ्या बोलण्यातला भाव ज्यांना समजणार नाही त्यांना कदाचित माझ्या वरिल लिहीण्याचा त्रास होईल ...पण मी खंत व्यक्त केली ती फक्त या ग्रुपवरिल सदस्यांपुर्ती सिमीत नाही..आपल्या सर्वांमध्ये कांही creative element असेल का अन असेल तर त्याचे काय..अन सिद्ध कधी होणार...! खंत ही आहे कि आपल्या पैकी कुणाचे भाषण ऐकायला लोक गर्दी करत नाहीत...वेडे होत नाहीत...आपला अभिनय पहाण्यासाठी गर्दी होत नाही..! कुणालाही साहित्य या प्रकारात रस नाही..ज्ञानपीठ कसा मिळणार..! आपल्या फोटोग्राफी..चित्रकलेचे प्रदर्शन नाही..! खेळाडू म्हणून जिल्हास्तरावर नाही...! आपण घेतलेल्या शिक्षणातुन समाजाला उपयोगी पडेल असे एखादे संशोधन नाही..एखाद्या विषयाचा विशेष अभ्यास नाही ..रांजेद्र सिंह सारखे पाणी तज्ञ .आपण लिहीलेल्या कुठल्याही पुस्तकावर ते घेण्यासाठी हॕरिपोटर सारख्या उड्या पडत नाहीत..कि आपण निर्माण केलेला अॕपल सारखा एखादा फोन घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागत नाहीत . सैराटला दोन आठवडे न बोलावता वा कुठल्याही आमिषाशिवाय गर्दी आहे...हे यश एकट्या नागराज मंजुळेच कारण creative mind & its output ,,निर्भेळ यश...! असे यश हे रोजच्या जगण्याच्या गोष्टीपेंक्षा वेगळे असते ...! कुठल्याही जगविख्यात मान्यताप्राप्त पुरस्कार आपल्यासाठी नाहीच का..? का तो सुद्धा विकत मिळायला लागल्यावर घेउ...! खंत ही आहे कि आपण creative आहोत पण आपल्याला सवय नाही creativity ची...creative गोष्टींची ...ईतकच..!
©प्रशांत जोशी
No comments:
Post a Comment