खरच मूली खुप ग्रेट असतात ..
श्रावण महिन्यात जन्म झाला म्हणून श्रावणी नाव ठेवलेल्या माझ्या लेकिचा आज 11 वा वाढ दिवस. 8 तारखेला जन्म झाला आणि इतरांच्या दृष्टीने शुभ नसलेला 8 हा अंक माझ्या साठी शुभांक झाला, म्हणूनच माझा मोबाइल असो की गाडीचा क्रमांक त्यात 8 हा हवाच. दिवस किती भराभर जातात, जन्मानंतर 4 महिने श्रावणी ला हातात घ्यायची भीती वाटायची तीच लेक आज आई सारखी माया , प्रेम आणि काळजी करते, 11 म्हणजे ही काही फार वय नाही पण या लाडक्या लेकीने आताच नाही तर लहान पणा पासून हे पाहिजे ते पाहिजे म्हणून हट्ट केलेला आठवत नाही की कधी रड़ा पड़ नाही . अभ्यासात हुशार गुणी आणि अतिशय समजदार अशा या लेकिच्या जन्माच्या वेळी जागून आणि हॉस्पिटल मध्ये काढलेली ती रात्र आज ही आठवते. या लेकिची आठवण आली आणि आपल्यावर जीवापाड़ प्रेम करणारी ही लेक एक दिवस लग्नानंतर आपल्याला सोडून जाणार या कल्पनेने ही मी रात्रि अपरात्रि उठून रडू लागतो,
आज मी घरा बाहेर , वाढ दिवसाला ही थांबता आले नाही, काल तीला ph वर बोलताना विचारले बेटा तुला काय गिफ्ट आणु , तर बोलली पप्पा काही नको, तुम्ही काम संपवून या मग आपण celebrate करू, तिचे शब्द ऐकले आणि डोळ्यात पाणी आले..
आज मी घरा बाहेर , वाढ दिवसाला ही थांबता आले नाही, काल तीला ph वर बोलताना विचारले बेटा तुला काय गिफ्ट आणु , तर बोलली पप्पा काही नको, तुम्ही काम संपवून या मग आपण celebrate करू, तिचे शब्द ऐकले आणि डोळ्यात पाणी आले..
खरच मूली खुप ग्रेट असतात ..
No comments:
Post a Comment