सावली !!!
राजकारण,समाजकारण ,कला, क्रीडा असो की साहित्य या क्षेत्रातील दिगज्जांचे सामान्यांना नेहमीच आकर्षण असते, हे लोक राहतात कसे ? बोलतात कसे ? वागतात कसे या सा-यां बद्दल एक कुतुहूल असते, या लोकांना भेटावे, बोलावे असे नेहमी वाटत असते, त्यांचा सहवास लाभावा असे वाटत असते. असाच एका मोठ्या राजकारणी व्यक्तीचा सहवास लाभलेला मी एक भाग्यवंत ! हे व्यक्तिमत्व म्हणजे माझे साहेब...वयाने तरुण असले तरी कर्तृत्वाने लहान वयातच मोठे झालेले एक तडफदार नेतृत्व !!! 15 वर्षांपूर्वी नौकरीच्या निमित्ताने त्यांच्या जवळ आलो आणि बघता बघता त्यांची सावली बनून गेलो. आज त्यांच्याशी असलेले हे नाते साहेब आणि कर्मचारी असे नव्हे तर एका जेष्ठ बंधूप्रमाणे झाले आहे. 24 तास सोबत राहणारा एक pa म्हणून त्यांच्या प्रत्येक सुख, दुःखाचा सर्वात जवळचा एक साक्षीदार ! त्यांच्या सोबत काम करतांना अनेक गोष्टी जवळून पाहायला मिळाल्या, अनुभवायला मिळाल्या. त्यांचा संघर्ष, त्यांचे नेतृत्व ,त्यांची सामान्यांच्या कामाप्रति असलेली तळमळ, जनतेशी असलेली आपुलकी, सहका-यांशी असलेला स्नेह, स्वभातील विनम्रता आणि सहनशीलता ! 'जया अंगी मोठेपण तया यातना कठीण' याचा सर्वात मोठा अनुभव साहेबां सोबत काम करताना येतो, 'आम्हा घरी रोज नित्य युद्धाचा प्रसंग' या प्रमाणे रोज येणा-या नव नवीन प्रसंगांना ते धीराने तोंड देत असतात,सामान्यांसाठी झटत असतात ! म्हणूनच ते माझ्यासाठी आहेत आयडॉल ,आवडते हिरो अन एक आदर्श !! वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला या लाडक्या नेत्याला खूप खूप शुभेच्छा !!!!
Jabardast Sirji
ReplyDelete