आठवण शाळेतल्या पहिल्या दिवसाची....
*आठवण शाळेतल्या पहिल्या दिवसाची*
काल शाळेचा पहिला दिवस म्हणून श्रेयसला सोडण्यास गेलो. पहिलाच दिवस असल्याने शाळेच्या आवारात सर्वच मुलांचे पालक आपापल्या मुलांना सोडण्यास आलेली , त्यांच्या 2 व्हिलर पासून ते मोठं मोठ्या गाड्यांची पार्किंग मध्ये हि गर्दी कि बस....काही पालक जोडीने आलेले....
सर्व मुले नीटनेटकी युनिफॉर्म मध्ये, पायात सॉक्स आज शूज, पाठीवर schoolbag चे ओझे, आत टिफीन अन पाण्याची waterbag.... प्रत्येक मुलगा असो वा मुलगी गोड, चुणचुणीत अन स्मार्ट ...प्रत्येकात त्या वयातही एक कॉन्फिडन्स... बिनधास्त पणे ती वावरत होती, बोलत होती... हिंदी , इंग्लिश मध्ये सफाईदार पणे बोलणा-या मूलांच्या या गप्पात विषय होते ..... कल कि इंडिया- झिमबॉम्बे match देखि क्या, तू कोनसे समर कॅम्प गया था, हम टूर पे गये थे, मैंने छुटीयो में ये गेम सिखा या नया ले लीया... सर्व चर्चा अशाच...._
त्यांच्याकडे पहात पहात मला शाळेतला दिवस डोळ्यासमोरून आठवू लागला..... घराच्या सर्वात जी जवळची शाळा असेल ती आमची शाळा असायची...मग ती जि. प.ची असो कि खाजगी.. शाळा जवळ म्हंटले कि कोणी सोडायला येणे अथवा स्कूल बॅग हा प्रकारच नाही. शाळेतला पहिला दिवस.... अर्धीच मुलं आलेली... शिक्षक हि मुलेच नाहीत म्हणून एकदा वर्गात चक्कर मारून बाकी सह शिक्षका सोबत गप्पात रंगलेली.... आहे तो ड्रेस घालून आलेली मुलं... कारण युनिफॉर्म फक्त 15 ऑगस्ट, 26 जानेवारीच्या आसपास दिसायचा...अन इतर वेळी त्याची सक्तीही तशी नसायची... घर जवळ म्हणून टीफिनचा विषय नसायचा... मधली सुट्टी झाली घरी पळायचं.... स्कूल बॅग म्हणजे घरातली पिशवी... नाहीतर पावसात भिजू नये म्हणून carry बॅग ची केलेली स्कूल बॅग.... काहींच्या हातात तशीच मोकळी वह्या , पुस्तके ! काही अनवाणी पायांनी आलेली तर बहुतांश मुलांच्या पायात स्लीपर नाहीतर थोडी बरी चप्पल... शूज अभावानेच एखाद्याच्याच पायात !! पहिल्या दिवशी धडपड असायची ती जागा धरायची, कारण पुढे वर्षभर तीच जागा ठरलेली असायची !! पहिल्या दिवशी तर सोडा 8 दिवस पुस्तके अन वह्या नसायची!!! मागच्या वर्षीच्या को-या पानातून केलेली एक रफ वही !! मागच्या वर्षीची पुस्तके अर्ध्या किमतीत विकून स्वतः साठीही वरच्या वर्गातील कोणाची तरी अर्ध्या किमतीत घेतलेली पुस्तके... ज्याच्या कडे गाईड तो वर्गातला सर्वात श्रीमंत मुलगा.... शाळेतला हौद हीच वॉटरबॅग... पहिल्या दिवशी चर्चा असायची तू मामाच्या गावाला काय केलं.... मी किती कोया , गोट्या जमा केल्या न तू किती केल्या.... वर्गात आलेली नवीन मूल बुजून गेलेली तर जुनी मुलं टवाल्या करणारी ...
अस होत आमचं बालपण... असा असायचा आमचा शाळेतला पहिला दिवस...
© *प्रशांतजोशी*दि 12 जून 2016
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEggzMR2ADIxW_z7ZAI02e0OBWQMKEvAotTRY3TM37p6-7ZqcLu9UfUaGeDc3LMEoIDQ4D0pg4T-QwNiDSiw3YR5NdwSSGEYxfNV3w5NlSeVR5SqGFx-b1_gqFVxKfaUtmvHFfpF07uX4Xs/s320/school.jpg)
अप्रतिम सर
ReplyDelete