लाडक्या लेकीचा #वाढदिवस !!
#Dearश्रावणी .....8 सप्टेंबर 2004 ला तु इवलीशी चिमणी होऊन तु आमच्या घरात आलीस आणि माझं जीवनच बदललं त्याला आज 12 वर्ष पूर्ण झाली. किती भराभर सगळं बदलत... किती लवकर मोठी होत आहेत... वयानं आणि समजूतदार पणे. जन्मानंतर 4 महिने तुला हातात घ्यायची भीती वाटायची, एका हातावर झोपणारी तू, पायाचा झोका करुन खेळणारी तु आज माझिच आई सारखी माया , प्रेम आणि काळजी करतेस. 12 म्हणजे हे काही फार मोठे वय नाही पण तु तर लहान पणा पासून हे आता पर्यंत कधी हे पाहिजे ते पाहिजे म्हणून हट्ट केलेला आठवत नाही की कधी रड़ा पड़ केलेले स्मरत नाही .....तरीही तुझ्याच किल बीलाने घर भरून जायचं....खेळण्यापेक्षा तु पुस्तकातच जास्त रमलीस.. दुस-या मुलांसारखं tv मध्ये गुंगु राहण्यापेक्षा जेंव्हा तु हातात पेन्सिल घेऊन drawing पेपर वर चित्र रेखाटण्यासाठी बसतेस तेंव्हा खूप सुखावतो मी....किती गुणी आणि समंजस आहेस तू....आज हे लिहीत असतांना तुझ्या जन्मापासून ते काल पर्यंतचे काही प्रसंग आठवले.... तुझ्या जन्माच्या वेळी हॉस्पिटल मध्ये जागून काढलेली ती रात्र आठवली. हल्ली कामामुळे तुला जास्त वेळ देता येत नाही तरीही तुझी आठवण रोज येते आणि आपल्यावर जीवापाड़ प्रेम करणारी ही लेक एक दिवस लग्नानंतर आपल्याला सोडून जाणार या साध्या कल्पनेनेच मला रडू येते. मागच्या वर्षी तुझ्या वाढ दिवसाला ही घरी थांबता आले नाही, तेंव्हा तुला फोन वर बोलताना विचारले होते बेटा तुला काय गिफ्ट आणु , तर तु बोलली पप्पा काही नको, तुम्ही काम संपवून या मग आपण celebrate करू, तुझे ते शब्द एकूण डोळ्यात पाणी आले.. म्हणूनच आज खास सुट्टी घेऊन तुझ्या सोबत थांबणार आहे.... मस्त दिवसभर तुझा बर्थडे साजरा करणार आहे....तुझ्या कडे पाहिले की खरोखर लक्षात येते की खरच मूली खुप ग्रेट असतात ..आणखी एक आठवण... मागच्या वर्षी तुझ्या वाढदिवसाला असंच काहीस लिहिलेले वाचून तु पोटाला बिलगली आणि रडतच म्हणाली होतीस पप्पा मी कुठे जाणार नाही हो तुम्हाला सोडुन पण असे काही लिहु नका कारण वाचून मला ही रडू येत आहे ... अगदी माझ्या सारखीच आहेस तु हळवी....तुझा बाप म्हणून तुझ्यासोबत वाढणं हे ही खूप आनंददायी आहे... वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बेटा.....तुझाच लाडकापप्पा —
व्वा खुप सुंदर व्यक्त झालास प्रशांत.... वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा
ReplyDeleteव्वा खुप सुंदर व्यक्त झालास प्रशांत.... वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा
ReplyDeleteखूपच मस्त .,.एक तरी मुलगी असावी
ReplyDeleteGreat 👌👌
ReplyDeleteखूप छान शब्दांकन आहे वाचून डोळ्यातून पाणी येते
ReplyDelete