वाडा ते घर .....
गणेशपार म्हणजे परळी शहरातील जूना भाग. याच भागातील आमचा चिरेबंदी वाडा...त्याला किल्ल्या सारखे मोठे सागवान लाकडाचा दरवाजा...हा दरवाजा बंद करतांना कड़ी सोबत एक आगळ असायची. ( आगळ म्हणजे भिंतिच्या दोन्ही बाजूला एक चौकोन त्यात एक चौकोणी जाड लाकुड लावायचे ) ही आगळ लावणे सोपे पण काढ़णे खुप अवघड. पण त्यामुळे 100% सुरक्षेची खात्री.
दरवाजा मधून आत गेल की नजरेत भरायच् मोठ आंगन अन् समोर 18 खनाचे माळवदी घर... या 16 खनात 4-4 खनाच्या 4 खोल्या ....या खोल्या म्हणजे एक स्वयंपाक घर ज्यात चुलीवर स्वयंपाक व्हायचा ...दूसरी खोली म्हणजे कोठी (आजची स्टोर रूम ) तर समोर 8 खणाची ओसरी ( आजचा शब्द म्हणजे हॉल ) राहिलेल्या 4 खणा पैकी 2 खनातुन या घरा मागच्या परसात जाणारी बोळ अन् 2 खणातुन माडीवर जायचा जीना.... माड़ी म्हणजे 20 खणाचा समोरची बाजू एक बाजु मोकळा असलेला किमान 30 by 30 चा हॉल .... अंगनात दोन्ही बाजूने प्रत्येकी 2 पत्राच्या खोल्या....तर परसात 4 पत्राच्या खोल्या... अंगणात एका संडास बाथरूम सह वर छप्पर नसलेली नहानी ( आजची बाथरूम ) अंगणात एक रोज किमान 5 फळे लागणारे अंजिराचे झाड़ तर परसाद आमच्या घरालाच् नाही तर आजु बाजूच्या 4 वाड़याला हवा देणारे विशाल लिम्बाच झाड़... सोबतच् एक जांभाचे झाड़....या वाड़यात माझा जन्म झाला. 8 ख़ण अन् एका माडित आमचे 5 मोठे आम्ही 6 मूल असे 11 जणांचे कुटुंब.... वाड़यातल्या 8 खोल्यात 8 भाड़ेकरू ....त्यांचे भाड़े किती तर किमान 25 ते जास्तीत जास्त 60 रु महीना....
भाडेकरु ही मुलासोबतचे ..अक्ख्या वाड़यात मिळून 40 ते 50 मानस सुखैनैव नांदायचो.... उन्हाळ्यात अंगणात अन् परसात एका ओळीने तर दुपारच्या उन्हात बोळीत झोपायचो... एक नळ 40 माणसाला पानी पुरवायचा तर कधी पाणी न आल्यास वाड़यातील आडाचा आधार असायचा .... लाईट होती पण लोड शेडिंग कधी नसायची.... सकाळी 6 उठायला लागायच कारण आई - आजीला शेनान घर सारवायला लागायच.... आंगन इतके मोठे की क्रिकेट पासून ते वीटी दांडू पासून गोट्या , कोया खेळायला पुरायच.... सकाळी झाडावर जाऊन मनसोक्त अंजिर खायची .... दुपारी लींबाच्या लिम्बोल्या जमा करून त्या विकायच्या हा आमचा नित्य क्रम.... एक रेडीओ सोडता tv चे सातवी पर्यन्त दूर दर्शनच् होते तर फ़ोन आठवीत असताना पाहायला मिळाला... पावसाळ्यातील अंघोळ म्हणजे वरुन पावसाचे पाणी अन् सोबत बकिटातले गरम पाणी.... पण सर्व एन्जॉय करायचो....याच्या बाहेर काही वेगळ अस घर असत हे माहीत असूनही ना कधी त्याची खंत वाटायची की रुखरुख ....कारण जे आहे त्यात समाधान मानायचे होते संस्कार ..
काळानुरूप सर्व बदलल ..झाडे तूटली... हवा देण्यासाठी पंखे आले... पत्रयाच्या खोलीत राहणारे भाड़ेकरु मिळेनासे झाले.... गल्लीत 24 तास पाणी देणारा बोअर येवूनही पाणी पुरेनासे झाले.... invertor आले पण त्याच्या लाईटनेही समाधान वाटेनासे झाले... 40 माणसे राहणा-या वाडयात 6 मोठया अन् 4 लहान माणसाला जागा कमी पडू लागली अन् आलेले पाहुणे कधी जातील असे वाटू लागले.....
बदल हा निसर्गाचा नियम आहे म्हणतात.... काळानुरूप झालेल्या बदलाला अनुसरुन आहे त्याच जागेवर नव घर बाँधताना आज या वाड़यातील एक प्रवेश द्वार सोडता जुन्या सर्व स्मृती मोडीत काढाव्या लागल्या.... आज या विशाल जागेत साकारले आहे एक दुमलजी 6 खोल्याचे घर.. जिथे सर्व जागच्या जागी आहे... सर्व सोयी सुविधा आहेत पण त्याही पेक्षा एक मोठे समाधान आहे अन् ते म्हणजे आम्ही याच मातीत आहोत,....याच जागी आहोत ... जिथे आहेत आमच्या लहान पणीच्या आठवणी ...अन् इथेच् झालेले संस्कार ...... जी शिदोरी आम्हाला द्यायची आमच्या कुटुंबातील मुलांना ......
- प्रशांत जोशी.
18/11/2015
No comments:
Post a Comment