Sunday, June 5, 2016

दहावीचा निकाल आणि आठवण.

दहावीचा निकाल आणि आठवण.....
उद्या सोमवारी दहावीचा निकाल. आमच्या वेळी दहावीच्या  निकालाची तारीख जाहीर झाल्यापासूनच निकालाच्या धास्तीने पोटात गोळा यायचा...कारण त्यावेळी आजच्या सारखा 85%, 90% , 95% निकाल नाही लागायचा तर 40 ते 65 % निकालाची परंपरा होती. दहावी म्हटले कि हमखास इंग्रजी आणि गणित या विषयात बहुतांश मुले नापास व्हायची, या नापासा पैकी फारच थोडी मुले शिकून पुढे जायची ! गल्लीतला एखादा मुलगा 40-45 % मार्क घेऊन पास झाला तरी हिरो ठरायचा ! आमच्या घरातल्या आमच्या 6 भाऊ- बहिणी पैकी माझ्या पेक्षा मोठी चौघे गणित आणि इंग्लिश या विषयात नापास झालेली. मी लहानपणा पासून तसा बरा हुशार असल्याने नापासाची भीती नव्हती, तरीही पोटात गोळा मात्र कायम होता, निकालाचा दिवस उजाडला अन मी 
75% मार्क घेऊन पास झालो. घरातच नाही नाही तर गल्लीतही इतके मार्क घेऊन पास होणारा मी पहिलाच ! वर्गातही तिसरा नंबर होता... आकाश ठेंगणे झाले होते. आजची मुले 95 , 96 आणि 99% मार्क घेतल्यावर ही नाराज झालेली जेंव्हा दिसतात तेंव्हा आपल्या त्या 75% मार्कांला किती किंमत होती असा प्रश्न पडतो. पण तो दहावीच्या निकालाचा थ्रिल मात्र काही वेगळाच !!

तुमच्या आहेत का अशा काही  दहावीच्या आठवणी ???


4 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. आहेत,लिहीणे आता अवघड,बघू या after retired ....Blog छान आहे,अभिनंंदन !!!!

    ReplyDelete
  3. आहेत,लिहीणे आता अवघड,बघू या after retired ....Blog छान आहे,अभिनंंदन !!!!

    ReplyDelete
  4. Ahet chikar aathwani, niwant lihito. Tuza blog chhan ahe dada

    ReplyDelete