Happy birthday यारा
रोहित नावाचा माझा एक खूप जिवलग मित्र आहे आज त्याचा वाढ दिवस त्याच्या बद्दल लिहिलेल्या चार ओळी
*रंगुनी रंगात सा-या*
*रंग माझा वेगळा*
*गुंतूनी गुंत्यात सा-या*
*पाय माझा मोकळा*
हे स्टेटस कोणाचे आहे माहीत का , आपला मित्र रोहितचे, अगदी असाच आहे तो या चार ओळी सारखा...
*रंगुनी रंगात सा-या*
*रंग माझा वेगळा*
*गुंतूनी गुंत्यात सा-या*
*पाय माझा मोकळा*
सगळ्या रंगात मिसळूनही, स्वतःचा रंग वेगळा ठेवणारा, अन गुंत्यात गुंतूनही पाय मोकळा ठेवणारा ... *नाही तर आम्ही* 😜😜😜 असो आजचा तो विषय नाही...
साधारण 8 वर्षांपूर्वी मी मुंबईत pa म्हणून काम करण्यास सुरुवात केल्यानंतर माझ्या सारखाच मुंबईत पहिल्यांदाच आलेला आणि नवखेपणामुळे चाचपडत काम करतांना भेटलेला एक तरुण, चॉकलेट बॉय सारखा दिसणारा , पाहता क्षणी कोणत्याही मुलीने *प्रेमात* पडावे असा चुणचुणीत मुलगा म्हणजे Rohit..... तसा मी मुलांच्या प्रेमात पडत नाही तरी ही याच्या प्रेमात पडलो ....
कदाचित दोघेही नवीन अन दोघांनाही एकमेकांच्या मदतीची गरज असल्याने इतक्या पटकन मैत्री झाली अन ती इतक्या घट्ट मैत्रीत कधी रूपांतरीत झाली की समजलेच नाही.
अतिशय हुशार, कामात स्मार्ट अन चुणचुणीत , सर्व विषयाची update माहिती असलेला आणि प्रचंड टेक्नोसावी असलेला हा मित्र ..... लाजरा , बुजरा प्रचंड समंजस ....
इंग्लिश movie प्रेमी 😜
E tv न्यूज चा हातात बुम घेऊन हैदराबाद ला पत्रकारिता केलेला जुना पत्रकार, उत्कृष्ट लेखक, कलाकार, सायकल , ट्रेकिंग प्रेमी ... चांगला pa...आणखी काय काय वर्णन करू ना....
मुंबई , नागपूरला दोघेही असलो आणि किती हि कामात buzy असलो तरी रात्रीचे जेवण सोबतच घ्यायचे हा आमच्या मैत्रीतील अलिखित नियम 7 वर्षांपासून कधी मोडल्या गेला नाही.....
अनेकदा सकाळच्या morning walk पासून ते रात्री एकत्र मुक्काम करतांना 24 तास सोबत राहूनही पुन्हा सकाळी निरोप घेताना या वेळी काही तरी बोलायचे राहूनच गेले अन यावेळी जरा वेळ कमीच मिळाला हि भावना कायम असते....
मैत्रीत आडपडदा असू नये म्हणतात... आमच्यात तसा अजिबातच नाही... स्वतः पेक्षा कदाचित एकमेकांबद्दलची जास्त माहिती असणारी अन ओळखणारी आमची जोडी......
आज या प्रिय मित्राचा वाढ दिवस त्या बद्दल एकाच ओळीत शुभेच्छा द्यायच्या झाल्या तर एकदा ओळीत ....
# *तेरे_जैसा_यार_कहाँ*
*कहाँ ऐसा याराना*