Sunday, August 12, 2018


#लग्नातील_गमती_जमती

#भाग 3 #गजरा

ही पण गंमत लग्नातीलच...त्यावेळी आम्ही कॉलेज कुमार होतो ( लग्नाळू तर आम्ही लहानपणापासुनच , शक्य असते तर बाल विवाहही केला असता ☺️) मित्राचे, मित्राच्या घरचे किंवा नातेवाईकाच्या घरचे लग्न म्हणजे आमच्यासाठी पर्वणी... 8-15 दिवस धमाल करण्याचे आणि भागवायचे दिवस...लग्नाआधी 8 दिवस आणि नंतर आमचा मुक्काम पोस्ट म्हणजे लग्नघर...
अगदी लग्न पत्रिका वाटपा पासून ते घरातील लाडू बांधण्यापर्यंतच्या , रुखवत तयार करण्यापासून ते नागीन डान्स करण्यापर्यंत सर्व कामात सक्रिय... हक्काचे सांगकामे मिळाले म्हणून त्या घरातील सर्वांच्या तोंडातही आमचेच नाव...15 दिवसाच्या मुक्कामा मुळे घरातील सर्व नातेवाईकांच्याही चांगल्या ओळखी व्हायच्या...
तर 8 दिवसाची सोय ते सोय आणि जमले तर एखाद्या ती चा शोध हा आमचा अशा लग्नात सक्रिय राहण्याचा उद्देश.... तर लग्नाच्या आदल्या रात्री आमचा एक प्लॅन फिक्स असायचा... महिला मंडळाला लागणा-या गज-यासाठी घरातल्या कारभारी माणसाकडून एकदाच 100-200 गज-याचे पैसे घ्यायचे... पुन्हा स्वतंत्रपणे काकू, ताई, मामी, मावशी यांना गाठून तुम्हाला गजरे आणायचे का म्हणून त्यांच्याकडून ही एकाने गपचुप पैसे जमा करायचे.... तर काका , मामा, दादा यांनाही वेगळे गाठून काकू, मावशी ताई ला गजरे आणायचे म्हणून त्यांच्या कडून ही पैसे घ्यायचे.... आता लग्न कार्य म्हटले की गज-या सारख्या गोष्टीला पैसे द्यायला कोणीच नाही म्हणायचे नाही...उलट अगदी आनंदाने पैसे मिळायचे... गजरा एक आणि पैसे तिघांकडून ...राहिलेल्या पैशात आमचे 8-15 दिवस गाडीतल्या पेट्रोलची आणि पॉकेट मनीची सोय व्हायची....
अशाच एका लग्नात मी असेच काकु, मावशी, ताई ,माई , अक्का करत पैसे जमा केले... काका, मामा, दादा कडून पैसे जमा करायची जबाबदारी सुहास वर सोपवली... तर समीरने घरातल्या मुख्य माणसाकडून 200 गज-याचे पैसे घेतले...ठरल्याप्रमाणे प्लॅन यशस्वी झाला... लग्नानंतर फोटो सेशन सुरू झाले... मुलाच्या एक मामी गज-यामुळे खुपच उठून दिसत होत्या... सुंदर बायकोकडे पाहात मामा मुड मध्ये येत चल ग एक फोटो काढून घेऊ म्हणून मामीला फोटोग्राफर कडे घेऊन गेले... फोटोसेशन सुरू असतांनाच मामा बोलले...गज-यामुळे तू खूप सुंदर दिसू लागली आहेस...खास मागवले मी तुझ्यासाठी...
तसा मामीचा मुड बीघडला...रागात येत हो म्हणे मी मागवले...15 वर्षात कधी एक गजरा तरी आणायचे माहीत आहे का ? ...मीच प्रशांतला सांगून गजरे आणले आहेत...मामी उतरल्या...
मामीचे उत्तर एकूण मामाला धक्काच बसला...अग मिच सुहासला सांगून गजरे आणले - मामा
मामी पुन्हा चिडत - चला जा, खोटे बोलू नका मला नाही काढायचा तुमच्यासोबत फोटो आणि बिटू...म्हणत तणक्यात निघून गेल्या...
केविलवाणे झालेले मामा... सुहास अरे सुहास करीत लग्न मंडपात सुहासला शोधत फिरत होते... सुहास त्यांना आज पर्यंत पुन्हा भेटलाच नाही.... आताही ते मामा जेंव्हा जेंव्हा परळीला येतात तेंव्हा तो लबाड सुहास कुठे आहे रे म्हणत त्याची आठवण काढीत असतात.
#भाबड्याचे_भन्नाट_किस्से

No comments:

Post a Comment