#लग्नातील_गमती_जमती
माझ्याच लग्नातील गोष्ट , 2 दिवस सोहळा अतिशय हसत, खेळत ,उत्साहात आणि आणि आनंदात सुरू होता....निरोपाची वेळ झाली...सगळे पाहुणे गाडित बसायच्या तयारीत...अचानक माईकवर लेक चालली सासराला गाणे लागले, सगळा मुड बदलला ...ती ( म्हणजे आमची बायको Vaibhavi ) पाहुण्यांचा निरोप घेत रडायला लागली...माहेरची सर्वच मंडळी इमोशनल झाली ...आता दुसरे गाणे लागले ...बाबूल की दुवाये लेती जा... पुन्हा रडणा-यांची संख्या वाढली आणि वेगही... वैभवी तर एकायलाच तयार नाही... हळूच एका मुलाला कानात सांगीतले जा रे ती गाणी बंद कर... चमत्कार झाला ...गाणी बंद झाली तसा मुड बदलला... रडण्याची गती कमी झाली....वातावरण बदलू लागलं तसं नेमके बँड वाले तडमडले... पुन्हा तेच गाणे... बाबूल की दुवाये लेती जा.. लेक चाचली सासरला....आणि पुन्हा निरोप आणि रडायचा कार्यक्रम सुरू झाला... काही केल्या तिचे पाऊल पुढे पडेना... गाडयात बसलेली व-हाडी मंडळी कंटाळली...मी ही वाट पाहून रडवेला झालो....दोघेही गाडीत बसलेलो तरी गाडी पुढे निघेना.... डोक्यात एक आयडिया आली.. समोर तिची एक मस्तीखोर मैत्रीण उभी होती... तीची आणि माझी ट्युनिंग चांगली जमायची... आँखो ही आँखो मे बात हो गयी... न बोलता काय करायचे समजले.... ती गाडी जवळ आली....वैभवी एक मिनिटं खाली ये म्हणून तिला गाडीखाली उतरावयाला लावले... काय होत आहे हे कोणालाच समजले नाही.....वैभवी उतरली...तशी ती गाडीत माझ्या बाजुला येऊन बसली अन म्हणाली... वैभवी तू बस इथेच रडत...मीच जाते भाऊजी सोबत.... चलो हो भाऊजी म्हणाली... अन ड्राइवर ने स्लेफ मारताच वातावरण बदलले... इतका वेळ रडून रडून लाल झालेले डोळे पुसत वैभवी मैत्रिणीवर चक्क ओरडली...ये शहाणे चल उत्तर खाली...सगळेच पाहुणे आता मोठं मोठयाने हसायला लागले... ती मैत्रीण खाली उतरली आणि आता मैत्रिणी मैत्रिणीची गळाभेट होऊन रडा पडी सुरू झाली तसे मी म्हणालो.... असं करू या तुम्ही दोघीही चला... अन गाडीत रडत बसा म्हणे... तसे पुन्हा सर्व पाहुणे हसायला लागली...अन हसत हसत आम्हाला निरोप दिला....
#दिलवाले_दुलनिया_ले_गये

No comments:
Post a Comment