Sunday, August 12, 2018

#लग्नातील_गमती_जमती

#मारोती #भाग_4

ही लग्नातली गंमत पण आम्ही बॅचलर आणि लग्नाळू गँगचे सदस्य असतांनाचीच...एका मित्राच्या बहीणीचे लग्न होते...
मुलाकडचे व-हाड आले त्यांच्या मागेपुढे करण्यात आम्ही व्यस्त...व-हाडातील एक काका कम आजोबा जास्तच आखडू...हे करा ते करा, ही सोय का नाही, ती सोय का नाही म्हणून आल्यापासून कचकच...मुलीकडचे पाहुणे म्हणून गुमान सहन करत होतो तसतसा त्याला चेव चढू लागला...सगळ्यांच्या डोक्यात जाऊ लागला...पण सगळे गप्प

रात्री शेवंती मिरवणूक निघाली... मुलीकडचे म्हणून आम्ही नाचायचा प्रश्न नव्हता... पण नवरदेव मुलाला आमची गँग चांगला डान्स करते माहीत होते, त्यांनी गळ घातली , नाचलेच पाहिजे...त्याचा आग्रह कसा मोडणार...आम्हाला पण ती हौस होतीच...नाही हो करत तुम्ही करा सुरू शेवंती,  आम्ही आलोच म्हणून कट मारला अन पोटाच्या टाकीत पेट्रोल टाकून आलो,

शेवंती सुरू झाली... लग्नाची मोठी तारिख असल्याने घोडा मिळालाच नाही, नव-या मुलाला मित्राच्या नव्या को-या #मारोती
800 गाडीत बसवले...मारोतीच्या पाराकडे शेवंती निघाली, dj वर डान्स सुरू होता पण त्यात उत्साह नव्हता , आम्ही आलो आणि नूर पालटला, नागीण डान्स सुरू... दे दनादण... ते आम्हाला त्रास देणारे काका कम आजोबा गाडीबरोबर हातात काठी , जाकीट, डोक्यावर फरची शाही टोपी घालून जशी काय यांचीच मिरवणुक सुरू आहे अशा थाटात चालत होते... एका मागे एक गाणे, शेवंती पुढे जाईना...त्या काकाचा आता संयम संपला, अरे चला लवकर उशीर होत आहे असा घोषा लावला.. कोणालाच ऐकू येईना आणि एकूण पण कोणी ऐकेना ...

त्या काकाने एकाला बाजुला घेतलं तो आपल्या ग्रुप चा वैभव होता , ते काका अरे पोरा ...ए पोरा, कुठे आहे मारुती .. वैभवची गाडी जोरात होती... त्याने मारोती कार दाखवली...काका चांगलाच चिडला...वैभव ला इतकी चढली होती की मारुती कार चा आवाज काढत डॉररर दर्र्रर्रर्र करत पळाला😂😂

आता त्या काकाने दुस-या मित्राला जवळ ओढले तो आपला जितु होता...ए पोरा, कुठे आहे मारुती , जितु - कोण मारुती, कुठला मारुती राव😂 ते बघा ते नागीण डान्स करत आहे
चला तुम्ही पण करा, मैं नागीण नागीण😂 करत जितु त्यांच्या समोरच नाचू लागला... म्हातारा जाम चिडला...

तीस-याला विचारले, अरे मारोती कुठे आहे, तो - कसला मारुती काळा का गोरा😂😂 .…म्हातारा आ वासून पाहू लागला... त्याने काठी उगारली तसा तो मित्र पळाला...

आता त्याने मला पकडले.. अरे मारोती मंदिर कुठे आहे,
मी - मंदिर तिकडे आहे लांब पण त्यात मारोती नाही...
म्हातारे काका - काय ?  मी -अहो , मारोती तिकडे नाचत आहे...

आता त्यांचा संयम पूर्ण सुटला, शेवटचा प्रयत्न म्हनून त्यांनी सुहास ला जवळ ओढले.. मारोती कुठे आहे रे...  मारुती नाव ऐकलं कि सुहास रडायला लागला ....मायला ...
आज शनिवार, मारुती चा वार, आणि मी पिलो😂😂...

तो म्हातारा तणतण काठी आपटत निघून गेला... आमच्या या खेळात एकाची म्हणजे सम्या ची फरफट होती बिचारा अरे ऐका रे ... चला रे करत होता... कारण लग्न त्याच्या बहिणीचे होते...


No comments:

Post a Comment