Tuesday, April 26, 2016

लेक.........


खरच मूली खुप ग्रेट असतात ..

श्रावण महिन्यात जन्म झाला म्हणून श्रावणी नाव ठेवलेल्या माझ्या लेकिचा आज 11 वा वाढ दिवस. 8 तारखेला जन्म झाला आणि इतरांच्या दृष्टीने शुभ नसलेला 8 हा अंक माझ्या साठी शुभांक झाला, म्हणूनच माझा मोबाइल असो की गाडीचा क्रमांक त्यात 8 हा हवाच.  दिवस किती भराभर जातात, जन्मानंतर 4 महिने श्रावणी ला हातात घ्यायची भीती वाटायची तीच लेक आज आई सारखी माया , प्रेम आणि काळजी करते, 11 म्हणजे ही काही फार वय नाही पण या लाडक्या लेकीने आताच नाही तर लहान पणा पासून हे पाहिजे ते पाहिजे म्हणून हट्ट केलेला आठवत नाही की कधी रड़ा पड़ नाही . अभ्यासात हुशार गुणी आणि अतिशय समजदार अशा या लेकिच्या जन्माच्या वेळी जागून आणि हॉस्पिटल मध्ये काढलेली ती रात्र आज ही आठवते. या लेकिची आठवण आली आणि आपल्यावर जीवापाड़ प्रेम करणारी ही लेक एक दिवस लग्नानंतर आपल्याला सोडून जाणार या कल्पनेने ही मी रात्रि अपरात्रि  उठून रडू लागतो,
आज मी घरा बाहेर , वाढ दिवसाला ही थांबता आले नाही, काल तीला ph वर बोलताना विचारले बेटा तुला काय गिफ्ट आणु , तर बोलली पप्पा काही नको, तुम्ही काम संपवून या मग आपण celebrate करू, तिचे शब्द ऐकले आणि डोळ्यात पाणी आले..
खरच मूली खुप ग्रेट असतात ..


Saturday, April 23, 2016

गिफ्ट............

गिफ्ट


परवा एका मित्राचा लग्नाचा वाढदिवस झाला, सहज त्याला विचारले काय गिफ्ट दिले वहीनीला ? तर त्याने 

वरचा हो फोटो पाठवला, अन क्षणभर धडकीच भरली, त्याला बोललो अरे..गिफ्ट छान असतात असे..पण 

त्यानंतर मनात काही विचार अन या पूर्वी असे गिफ्ट दिल्यावर जे सर्वसाधारण प्रसंग डोळ्यासमोर आले ते 

असे, मोकळेपणाने घालता येतील अशी परिस्थिती नसल्यामुळे बहुतांशी असे दागिने बँकांच्या लाँकर मध्येच 

ठेवावे लागतात .त्यातल्या त्यात ज्या दिवशी हे दागिने वापरण्यास काढले जातात...त्यादिवशी व त्यानंतरचा 

पुढचा आठवडा हे घरातले tension वाढवणारेच असतात.असे दागिने घालुन घरच्यांसमोर व पाहुण्यासमोर 

येताना ब-याच बायका खुप दडपणाखाली असतात व त्यांचे कावरेबावरे चेहरे पहाताना सगळ्यांना गोधळुन 

जायला होते.मजेशीर असतो तो दिवस ज्यादिवशी बायका एखाद्या नविन दागिना सार्वजनिक कार्यक्रमात 

पहिल्यांदा घालतात . त्यांना आलेल दडपण त्या वारंवार नव-याला "अहो कसा दिसतोय हा दागिना मला ? " 

हा प्रश्न सारखे आरशात विविध प्रकारे पहात एवढया वेळा विचारतात कि नवरा वैतागून मनातल्या मनात 

कुठुन हिला हा दागिना घेतला असे पश्चतापी भाव चेहऱ्यावर आणतो. ईतरासंमोर जाताना वा गेल्याबरोबरचे  

हावभाव पहाण्यासारखे असतात..किती लाजु अन काय करु की आता असे झालेले असते त्या स्त्रीला .. 

बारकाईने पहा..मनातल्या मनात नवरा हसत रहातो...अगदी आज एखादी मिस युनिव्हर्स बरोबर हातात हात 

घालुन आलो कि काय असे वाटते ..! खरी मजा सुरू होते जेव्हा शेजारच्या वा ओळखीच्या बायका जवळ येऊन 

त्या दागिन्याची चौकशी करायला लागतात अन खोटखोटच, मनातुन जळफळाट होत असुन सुद्धा म्हणतात 

" किती छान आहे ग तुला अगदी शोभुन दिसतोय .""....झाल जग जिंकल्याच्या आनंदात नव-याकडे

समाधानाने पहात ज्या ज्या स्रियांना आवर्जून दाखवने गरजेचे आहे, ज्या स्टेटस नि मोठ्या आहेत व ज्यांचे 

मागचे हिशेब बाकी आहेत ते फेडण्यासाठी त्यांच्या भेटीगाठी सुरु होतात.ईतर स्रिया ज्या येताना नव-याबरोबर

हसत हसत आलेल्या असतात पण हा तिचा दागिना पाहुन बिथरलेल्या असतात..अस्वस्थ झालेल्या असतात

व कधी एकदा कार्यक्रम संपतो याची वाट बघत अधन-मधन नव-याकडे जळजळीत कटाक्ष टाकत 

मनातल्या मनात " बघा ते भौजी ..कसे लाड करतात बायकोचे अन तुम्ही ..मेली माझच नशीब फुटक 

म्हणून तुमच्यासारखा गळ्यात बांधुन घेतला " अस म्हणत खाऊ कि गिळु अशा नजरेनं पहायला लागतात..! 

बिचारे नवरे घरी गेल्यावर रात्रीच्या मनोमिलनाचे स्वप्न रंगवत असताना त्यांना जाणीव सुद्धा नसते कि 

आपल्या समोर आज काय वाढुन ठेवले आहे..! त्यातल्या त्यात कार्यक्रम घरचा असेल, एकत्र कुटुंब असेल 

अन सासवा , नंदा..भावजया आसतील तर नव-याला पुढे काय संकट वाढुन ठेवले आहे लक्षात येत नाही. आई

पासुन सगळ्या स्रिया एका क्षणात आपल्या विरोधात कशा जातात याचा अनुभव काही वेळातच यायला 

लागतो . बहिणींचे त्या दिवशीचे हावभाव, टोमणे व्यवस्थित हाताळले तर ठिक नाहितर एखाद्या 

आविस्मरणीय भांडणाला जन्म देउन जातात ..! अन त्या रात्री समस्त नवरे एका वादळाला सामोरे 

जातात...अस काय घडल याचा शोध रात्रभर घेत जागी राहतात ...ज्यांना शक्य असत ते खर्चाच्या तयारीला

लागतात ...ज्यांना शक्य नसते ते लांब राहतात अशा मित्रांपासुन,,,समारंभांपासुन...!






बेड no 13


बेड no 13

वेळ रात्रिच्या 11.50 ची....घराच्या दरवाजाची बेल वाजली ...वाजली कसली कर्ण कर्कश न थांबनारा 

आवाज....सोबत दरवाजावर लाथा बुक्याचा प्रहार. अंगावर थरकाप उडाला ... तसा तो रोजच होत होता...पण 

आज थोड़ा जास्त....अमित चे मागील 6 महिन्या पासूनचे हे रोज चे झाले होते ...रात्रि अपरात्रि दारुच्या नषेत 

येणे ... शिविगाळ करीत अंगावर तूटुन पडणे....तो दारुचा शिसारि येणारा वास...कधी शारीरिक वार तर कधी 

बायको असूनही अक्षरश: बलत्कार..... सर्व सहन करत होते ....कारण मला आधार नव्हता....आयुष्यात 

शिक्षण घेतले नाही याचा पश्चाताप होत होता.. घरची गरीबी म्हणून आई वडिलांनी लहान वयात मोठे घर 

म्हणून लग्न लावुन दिले आणि हे भोग नशीबाला आले, लग्ना नंतर 3 वर्षात अमित बदलला ..... त्यातला 

राक्षस जागा झाला., रोज मारधोड करु लागला मी हतबल होते ...संकटातुन सूटायची वाट पाहात होते ....काय 

करावे याचा विचार करीत असताना तो चक्क आज दरवाजा तोडून आत आला , आज त्याचा अवतार वेगळाच

होता, दरवाजा तोडून आत घुसत हातात बेल्ट घेवून बडवू लागला, मी ओरडत होते , पण त्या बंगल्यात माझा 

आवाज एकनारे कोणी नव्हते, मोकळ्या सुटलेल्या केसाना ओढ़ीत तो जनावरासारखे घेवून जात होता, तसेच 

गाडीत कोम्बले, त्याच्या मनात काय आहे समजत नव्हते, दारु च्या नषेत वेगात तो वेगात गाडी चालवत 

होता, कुठल्याही क्षणी गाडीचा अपघात होईल असे वाटत होते, गाडीच्या काचा उघड्या असल्याने बाहेरचा 

मुसळधार पाऊस आणि वारा यामुळे गाडी आतून ओली झाली मी चिंब भिजले, गाडीचा अपघात व्हावा त्यात 

मरण यावे आणि माझी सुटका व्हावी असा विचार सुरु असतानाच गाडी एका झाड़ाला धडकली, मी पाठीमागे 

असल्याने गाडी बाहेर फेकल्या गेले, तो जागीच गतप्राण झाला होता, मी रुग्नालयाच्या 13 no च्या बेडवर 

उपचार घेत होते, देवाने माझे अर्धेच म्हणणे ऐकले होते, एका संकटातुन सुटका करतानाच उरलेल्या 

आयुष्यात पुन्हा एकटीने जगायचे संकट कायम ठेवले होते....


त च ध झाल अन् ............

त च ध झाल अन् .......जानव्हीला भेटायची संधी हुकली

ध च मा झाल्यामुळे काय काय होते हे आपण बरेचदा एकल असेल... पण त च ध झाल्यावर ही काही तरी होत 

याचा अनुभव परवा मी घेतला. पुण्याच्या बालगंधर्व मध्ये एका कार्यक्रमाला जाण्याचा योग आला तिथे 

अभिनेता प्रशांत दामले आणि तेजश्री प्रधान प्रमुख पाहुणे होते, या दोघासोबत त्यात ही तेजश्री उर्फ़ आपली  

महाराष्ट्राची लाड़की सुन जानव्हि सोबत मस्त सेल्फ़ी काढायचा असा माझा fix बेत होता, त्या तयारीत

असतानाच सूत्र संचालन करणा-याने तेजश्री प्रधान चा उल्लेख धनश्री प्रधान ऐसा केला, चोखंदळ (?) 

पुणेकरांच्या नजरेतून ही चूक हुकली पण ती माझ्या लक्षात आली पण उगाच ही दूसरी धनश्री असावी अशी 

शंका आली सूत्र संचलन कर्ता बरोबर असावा असा विचार केला सेल्फ़ी चा नाद सोडून दिला आणि जानव्हि ला 

भेटायची संधी राहून गेली ( ती मेकअप मध्ये नव्हती तर नॉर्मल होती म्हणून ही माझी थोड़ी ओलखण्यात

गफलत झाली असावी)

असो सांगायचा उद्देश् हा की तिला भेटून बाई तुझी डिलिवरी कधी होणार हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न

विचारायचा राहूनच गेला 


प्रशांत जोशी: 


😞

2 स्पेशल.....

2 स्पेशल


आज खुप वर्षानंतर मुंबई च्या एनसीपीअ या नरीमन पॉइंट भागातील राष्ट्रीय कला केंन्द्रात 2 स्पेशल हे मराठी नाटक पाहिले

हे नाट्यगृह इतके अप्रतिम आहे की आधुनिक पण आपण 1857 च्या काळातील नाट्य गृहात् नाटक पहात आहोत असा फील झाला

पत्रकार आणि pro यांच्या जीवनाची एका वेगळ्या वळणावरची प्रेम कहानी या नाटकात मांडली आहे.

उपस्थित पत्रकार श्रोत्यांना हे नाटक स्वत्; च्या जीवनावर आहे असे वाटत होते तर मला pro आणि पत्रकार या दोन्ही भूमिका करीत असल्याने दोन्ही बाजूने स्वत; ला मी त्यात पहात होतो.

सुन्दर नाट्यगृह , अप्रतिम अभिनय, मनाला भीड़नारी कथा आणि नाटकानंतर कलावंतांशी केलेला मुक्त संवाद, फ़ोटो सेशन यामुळे 4 तास कुठे गेले हे ही समजले नाही.

एनसीपीअ सारखे सूंदर नाट्यगृह इतक्या जवळ असूनही आपल्याला माहीत नव्हते याची खंत वाटली तसेच आपण 4_4 तास रीकामा वेळ whats up घालवण्यापेक्षा आशा कालाकृती पाहिल्या पाहिजेत हे समजले

thx # सागर कुलकर्णी # मंगेश चिवटे

प्रशांत जोशी




आहेराच पाकीट .....

आहेराच पाकीट .....

------------------------
माझे लग्न जमले तेंव्हा बायको एका कंपनीत टेलिफोन ऑपरेटर म्हणून नौकरीला होती,

लग्नाच्या दिवसापर्यंत तिची नौकरी सुरूच होती. टेलीफोन ऑपरेटर म्हटल्यावर काय दिवसभर 4 पैकी एक 

लाईन माझ्यासाठीच एंगेज असायची, मी miss कॉल द्यायचा अन ती कंपनी च्या फोन वरून कॉल करायची. 

4 महिने असच चालू होत. लग्नाला त्या कंपनी चा बॉस बायको मुला सह आला, छान फोटो काढले अन हातात

एक पॉकेट गिफ्ट दिले, छान रंगीत पॉकेट त्यावर with best compliments from म्हणून कंपनीचे आणि

आमचेही नाव. लग्नात आहेराची पॉकेट खूप आली पण यात काय असेल याची उत्सुकता बायकोला खूप 

लागली होती कारण ते तिच्या कंपनी तर्फे आले होते, बॉस गेल्यापासून ते पॉकेट कधी फोडू न कधी नाही अस 

झालं होत, 2 -3 वर्ष कंपनी मध्ये काम केलेले असल्याने अन एक सेँसियर कर्मचारी म्हणून ओळख 

असल्याने बॉस ने नक्कीच काही तरी खास गिफ्ट दिल असेल असे तिला वाटत होते, त्यात पैशापासुन ते 

गिफ्ट vouchar, विमान तिकीट, टूर पॅकेज असे काय काय तिचे अंदाज होते. लग्नानंतर चार दिवस गेले अन 

सर्व कुटुंब एक दिवस कोणी कोणी काय  गिफ्ट दिले हे फोडत बसलो, ते पाकीट तिने खास जपून ठेवले अन 

सर्वात शेवटी उघडायचे म्हणून राखून ठेवले. अखेर तो क्षण आला अन ते पॉकेट हळूच उघडले , आणि आतून 

जे निघाले ते खरच स्पेशल होते,  28 पानाचे ते एक बिल होते ,  ते वाचू लागलो तर त्यावर फक्त माझ्या 

मोबाईलला मागील 4 महिन्यात किती कॉल कंपनीच्या फोन वरून गेले त्याचा मिनिट, तारिख , वेळ अन 

त्याचे किती बिल आले त्याचा तपशील होता, शेवटच्या पानावर एकूण बिलाची रक्कम होती 26 हजार 978 रु

फक्त !!!!   त्या वर paid चा शिक्का अन हेच आमचे गिफ्ट , आहेर असा हाताने लिहिलेला शेरा होता,

आज हि कोणत्या ही लग्नाला गेलो अन आहेराची वेळ आली कि हा किस्सा आठवतो अन हसायला येत.

Prashant Joshi


हेच फळ काय दृष्टीदात्याला

हेच फळ काय दृष्टीदात्याला
-------------------------------मागील 4 दिवसापासून मुंबईच्या जे.जे. रुग्णालयातील डॉक्टर मंडळीचा सुरु असलेला संप , त्यामुळे राज्यभरातील रुग्णांचे होणारे हाल या बातम्या वाचून खूप अस्वस्थ होतो. पण त्या पेक्षा जास्त जास्त अस्वस्थ होतो ते या संपाचे कारण समजल्यानंतर. संपाचे कारण काय तर पद्मश्री आणि एक लाखा पेक्षा जास्त रुग्णाना दृष्टी देणा-या डॉक्टर नाही तर साक्षात देवदूत असणा-या डॉक्टर टी. पी. लहाने यांच्या विरुद्धचे खोटे आरोप...या अस्वस्थतेच 10 वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आठवला.डॉ तात्याराव लहाने परळीत कुठल्याशा एका शिबीरासाठी आले होते. वडिलांची अंधुक झालेली दृष्टी सुधारण्यासाठी कोणीतरी सांगितले की शिबिरात घेऊन जा . डॉ. लहाने यांनी सांगितले की, वेळ जवळपास निघून गेलीय पण 2 - 3 दिवसांत मुंबईत आणा प्रयत्न करू. बरीच जुळवा जुळव करून मुंबईला नेलं. स्वतः डॉ तात्यांनी ऑपरेशन केलं. वडिलांची दृष्टी स्पष्ट सुधारली. इतकी की ऑपरेशन नंतर जुन्या बुटास हे नवीन बूट कोणी आणलं अशी विचारणा केली. ही घटना मनावर कायमची कोरली गेली. या देवमाणसाचे कधी आणि कसे पांग फेडावेत हाच कायम मनात विचार असायचा. हा माझा एकट्याचा अनुभव नाही तर तो आहे राज्यातल्या लाखो रुग्णाचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा.काळ- एप्रिल 2016त्याच डॉ तात्यांबद्दल पेपरला उलट सुलट बातम्या येत आहेत. त्यांनी हॉस्पिटल यशाच्या शिखरावर नेलं म्हणून व्हाट्सअपला पोस्ट फिरत होत्या आणि त्याच हॉस्पिटलमध्ये त्यांचे सहकारी डॉ त्यांच्या कथित जाचाविरोधात आंदोलन करत होते. महाराष्ट्रातील लाखो लोकांना दृष्टी देणारा आणि ज्याची दृष्टी काळापलीकडं आहे तो अशी संकुचित कृती कशी करू शकतो अशी शंका ही मनाला शिवत नव्हती. महिनाभराचे पेपर्स झटपट डोळ्याखाली घातले. काही फोन फिरवले. मग या प्रकरणामागचं आर्थिक, राजकीय गूढ उकलत गेलं. हॉस्पिटलला 650 कोटी निधी मिळणार आहे. त्यात आपली काही डाळ शिजणार नाही असं काहींना भीती असल्यानेच ही उठाठेव सुरु असल्याचा निष्कर्ष निघाला आणि मन पेटून उठलं. योगायोगाने माझे साहेब धनंजय मुंडे यांनी सांगितले प्रशांत हा विषय आपल्याला सभागृहात मांडायचा आहे. त्यांच्या सूचनेप्रमाणे प्रस्ताव तयार केला आणि विधानपरिषदेत हंगामा झाला. डॉक्टरांचे महान कार्य साहेबांनी सांगितले आणि त्यामागच्या षडयंत्राचा पर्दाफाश केला, सारे सभागृह डॉक्टरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले . या देवदुताचे पांग फेडण्याचं खारीएवढे कार्य साहेब यांच्या माध्यमातून नियतीनच माझ्याकडून करून घेतले. योगायोगाने डॉक्टर साहेब यांची त्याच दिवशी सभागृहात भेट झाली, त्यांचे बोलणे सहज आणि काही झालेलेच नाही अस दाखवीत होते, पण डोळ्यात एक भाव होते , हेच फळ काय मम् तपाला ...हेच फळ काय मम् तपाला ...प्रशांत जोशी9822532808




भीषणता दुष्काळाची !

भीषणता दुष्काळाची ! ------------------------- मागील 2 दिवस दुष्काळग्रस्त मराठवाड्यात ( माझ्या साहेबासोबत ) फिरण्याचा योग आला. या 2 दिवसात 40 ते 44 डिग्री तापमानात सकाळी 7 ते रात्री 11 वाजे पर्यंत फिरलो , सूर्य आग ओकत होता, गाडीत जरी ac होता तरी प्रत्येक 2-4 किलोमीटर वर उतरून जनतेशी संवाद साधताना बसणारे उन्हाचे चटके ! खेड्या पाड्यात गाड्या जात नाहीत तिथे करावी लागणारी पायपीट , काट्या- कुट्याचे रस्ते ! निवा-याला कुठे जागा नाही , कि सावलीसाठी एखादे मोठे झाड नाही, वारे वाहायचे पण ते वारे नव्हते तर त्या होत्या उन्हाच्या झळा !!! लांबच्या लांब दिसायच्या त्या फक्त कोरड्या पडलेल्या काळ्या जमिनी !! ज्यांच्या भेगा पाहून त्यांची तहान जाणवायची ! पण आम्हाला होणा-या या त्रासापेक्षा मन जास्त सुन्न झाले ते दुष्काळ ग्रस्ताच्या व्यथा ऐकून ! औरंगाबाद, बीड, जालना, लातूर , उस्मानाबाद या 5 जिल्ह्यात असंख्य नागरिकांशी संवाद साधतांना त्यांच्या डोळ्यात दिसत होते ते फक्त आजचे दुःख, सहन कराव्या लागत असलेल्या वेदना आणि उद्याची चिंता ! महिलांना चिंता होती ती आज तरी टँकर येईल का आणि 2 हांडे मिळतील का याची ? मुलांना चिंता ती आमच्या बापाला या वर्षी तरी आमची फीस भरता येईल का आणि शिक्षण घेता येईल का याची ! शेतक-याला तर एक नाही तर 10 चिंता खात होत्या, बोलतांना परिस्थीतीमुळे त्यांचा आवाज खोल गेला होता, पिण्याचे पाणी आटले होते तसेच त्यांचे अश्रू हि संपले होते, कोरड्या मनाने ते व्यथा सांगत होते ! शेतात पिकल नाही, खायला अन्न नाही आणि प्यायला पाणी नाही ! शेतीवर कर्ज - बँक कधी जप्ती आणेल नेम नाही , जप्ती नाही आली तरी जून फिटलं नाही तर पुन्हा खरीपासाठी कर्ज मिळेल का ? कर्ज मिळाले तरी पुन्हा पाऊस येईल का आणि आमचे दारिद्र्य दूर होईल का ! पोराची फीस कशी भरू अन वयात आलेली पोर बिन लग्नाची घरात कशी ठेवू ! अर्धा जीव घरात अन अर्धा जीव पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळलेल्या अन छावणीत असलेल्या जनावरात ! एक एक अनुभव एकूण मन सुन्न होत होत, या लोकांना धीर कसा द्यावा समजत नव्हत ! जिथे एक मिनिट उभे राहणे कठीण त्या 44 डिग्री उन्हात egs च्या कामावर दिवसभर काही हात राबत होते, गावच्या गावे ओस पडली होती अन आड, विहिरी , नद्या , नाल्या कोरड्या ! सरकारी मदत मिळते का ? या प्रश्नाला ते हो मिळते कि , दुबार पेरणीला 1500 आले अन नुकसान भरपाईचा 100 रु चा चेक ! असे उपहासात्मक उत्तर देत काही जण मोटारी बंद असताना आलेली लाईटची बिल हातावर आणून ठेवत होती ! एरवी गावात गेले की आपुलकीने पिण्याच्या पाण्याचा तांब्या हातात देणा-या गावक-यांची आपुलकीही या दुष्काळामुळे हिरावून घेतली होती . मन सुन्न झालं, पण एक गोष्ट समाधानाची वाटली, काही गावानी आपला संघर्ष सोडला नव्हता, घरातलं किडूक - मिडूक विकून लोक वर्गणी करून गावची नदी, नाले खोल करणे, गाळ काढणे , पाणी आडवन्यासाठी बंधारे बांधणे अशी चांगली कामे ते करत आहेत, पावसाची त्यांना आशा आहे, हे ही दिवस जातील हा विश्वास आहे ! संकटाचे ते संधीत ते रुपांतर करत आहेत ! पाण्याचे महत्व त्यांना पटले आहे, तसेच तुम्हा , मला शहरात राहणा-या लोकांना समजो आणि परमेश्वराने यावर्षी भरपूर पाऊस पाडावा अशीच मी या दोन दिवसात प्रार्थना करीत होतो. प्रशांत जोशी दि. 23 /4/2016