बेड no 13
वेळ रात्रिच्या 11.50 ची....घराच्या दरवाजाची बेल वाजली ...वाजली कसली कर्ण कर्कश न थांबनारा
आवाज....सोबत दरवाजावर लाथा बुक्याचा प्रहार. अंगावर थरकाप उडाला ... तसा तो रोजच होत होता...पण
आज थोड़ा जास्त....अमित चे मागील 6 महिन्या पासूनचे हे रोज चे झाले होते ...रात्रि अपरात्रि दारुच्या नषेत
येणे ... शिविगाळ करीत अंगावर तूटुन पडणे....तो दारुचा शिसारि येणारा वास...कधी शारीरिक वार तर कधी
बायको असूनही अक्षरश: बलत्कार..... सर्व सहन करत होते ....कारण मला आधार नव्हता....आयुष्यात
शिक्षण घेतले नाही याचा पश्चाताप होत होता.. घरची गरीबी म्हणून आई वडिलांनी लहान वयात मोठे घर
म्हणून लग्न लावुन दिले आणि हे भोग नशीबाला आले, लग्ना नंतर 3 वर्षात अमित बदलला ..... त्यातला
राक्षस जागा झाला., रोज मारधोड करु लागला मी हतबल होते ...संकटातुन सूटायची वाट पाहात होते ....काय
करावे याचा विचार करीत असताना तो चक्क आज दरवाजा तोडून आत आला , आज त्याचा अवतार वेगळाच
होता, दरवाजा तोडून आत घुसत हातात बेल्ट घेवून बडवू लागला, मी ओरडत होते , पण त्या बंगल्यात माझा
आवाज एकनारे कोणी नव्हते, मोकळ्या सुटलेल्या केसाना ओढ़ीत तो जनावरासारखे घेवून जात होता, तसेच
गाडीत कोम्बले, त्याच्या मनात काय आहे समजत नव्हते, दारु च्या नषेत वेगात तो वेगात गाडी चालवत
होता, कुठल्याही क्षणी गाडीचा अपघात होईल असे वाटत होते, गाडीच्या काचा उघड्या असल्याने बाहेरचा
मुसळधार पाऊस आणि वारा यामुळे गाडी आतून ओली झाली मी चिंब भिजले, गाडीचा अपघात व्हावा त्यात
मरण यावे आणि माझी सुटका व्हावी असा विचार सुरु असतानाच गाडी एका झाड़ाला धडकली, मी पाठीमागे
असल्याने गाडी बाहेर फेकल्या गेले, तो जागीच गतप्राण झाला होता, मी रुग्नालयाच्या 13 no च्या बेडवर
उपचार घेत होते, देवाने माझे अर्धेच म्हणणे ऐकले होते, एका संकटातुन सुटका करतानाच उरलेल्या
आयुष्यात पुन्हा एकटीने जगायचे संकट कायम ठेवले होते....
No comments:
Post a Comment