हेच फळ काय दृष्टीदात्याला
हेच फळ काय दृष्टीदात्याला
-------------------------------मागील 4 दिवसापासून मुंबईच्या जे.जे. रुग्णालयातील डॉक्टर मंडळीचा सुरु असलेला संप , त्यामुळे राज्यभरातील रुग्णांचे होणारे हाल या बातम्या वाचून खूप अस्वस्थ होतो. पण त्या पेक्षा जास्त जास्त अस्वस्थ होतो ते या संपाचे कारण समजल्यानंतर. संपाचे कारण काय तर पद्मश्री आणि एक लाखा पेक्षा जास्त रुग्णाना दृष्टी देणा-या डॉक्टर नाही तर साक्षात देवदूत असणा-या डॉक्टर टी. पी. लहाने यांच्या विरुद्धचे खोटे आरोप...या अस्वस्थतेच 10 वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आठवला.डॉ तात्याराव लहाने परळीत कुठल्याशा एका शिबीरासाठी आले होते. वडिलांची अंधुक झालेली दृष्टी सुधारण्यासाठी कोणीतरी सांगितले की शिबिरात घेऊन जा . डॉ. लहाने यांनी सांगितले की, वेळ जवळपास निघून गेलीय पण 2 - 3 दिवसांत मुंबईत आणा प्रयत्न करू. बरीच जुळवा जुळव करून मुंबईला नेलं. स्वतः डॉ तात्यांनी ऑपरेशन केलं. वडिलांची दृष्टी स्पष्ट सुधारली. इतकी की ऑपरेशन नंतर जुन्या बुटास हे नवीन बूट कोणी आणलं अशी विचारणा केली. ही घटना मनावर कायमची कोरली गेली. या देवमाणसाचे कधी आणि कसे पांग फेडावेत हाच कायम मनात विचार असायचा. हा माझा एकट्याचा अनुभव नाही तर तो आहे राज्यातल्या लाखो रुग्णाचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा.काळ- एप्रिल 2016त्याच डॉ तात्यांबद्दल पेपरला उलट सुलट बातम्या येत आहेत. त्यांनी हॉस्पिटल यशाच्या शिखरावर नेलं म्हणून व्हाट्सअपला पोस्ट फिरत होत्या आणि त्याच हॉस्पिटलमध्ये त्यांचे सहकारी डॉ त्यांच्या कथित जाचाविरोधात आंदोलन करत होते. महाराष्ट्रातील लाखो लोकांना दृष्टी देणारा आणि ज्याची दृष्टी काळापलीकडं आहे तो अशी संकुचित कृती कशी करू शकतो अशी शंका ही मनाला शिवत नव्हती. महिनाभराचे पेपर्स झटपट डोळ्याखाली घातले. काही फोन फिरवले. मग या प्रकरणामागचं आर्थिक, राजकीय गूढ उकलत गेलं. हॉस्पिटलला 650 कोटी निधी मिळणार आहे. त्यात आपली काही डाळ शिजणार नाही असं काहींना भीती असल्यानेच ही उठाठेव सुरु असल्याचा निष्कर्ष निघाला आणि मन पेटून उठलं. योगायोगाने माझे साहेब धनंजय मुंडे यांनी सांगितले प्रशांत हा विषय आपल्याला सभागृहात मांडायचा आहे. त्यांच्या सूचनेप्रमाणे प्रस्ताव तयार केला आणि विधानपरिषदेत हंगामा झाला. डॉक्टरांचे महान कार्य साहेबांनी सांगितले आणि त्यामागच्या षडयंत्राचा पर्दाफाश केला, सारे सभागृह डॉक्टरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले . या देवदुताचे पांग फेडण्याचं खारीएवढे कार्य साहेब यांच्या माध्यमातून नियतीनच माझ्याकडून करून घेतले. योगायोगाने डॉक्टर साहेब यांची त्याच दिवशी सभागृहात भेट झाली, त्यांचे बोलणे सहज आणि काही झालेलेच नाही अस दाखवीत होते, पण डोळ्यात एक भाव होते , हेच फळ काय मम् तपाला ...हेच फळ काय मम् तपाला ...प्रशांत जोशी9822532808
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj4N3bs8UX5Wl78J2mO7M0adeel4szVWwG4cK1GkzS4OWKMQagGL1ZoPyvJikKIgqezJRurYeWLtENgckkoVR-Tj3tHNnRXBXv6o5YCfvuC7armNlxpRi3Jl1MHLT0VAa5cfMx_aQtACxY/s1600/download.jpg)
No comments:
Post a Comment