Saturday, April 23, 2016

आहेराच पाकीट .....

आहेराच पाकीट .....

------------------------
माझे लग्न जमले तेंव्हा बायको एका कंपनीत टेलिफोन ऑपरेटर म्हणून नौकरीला होती,

लग्नाच्या दिवसापर्यंत तिची नौकरी सुरूच होती. टेलीफोन ऑपरेटर म्हटल्यावर काय दिवसभर 4 पैकी एक 

लाईन माझ्यासाठीच एंगेज असायची, मी miss कॉल द्यायचा अन ती कंपनी च्या फोन वरून कॉल करायची. 

4 महिने असच चालू होत. लग्नाला त्या कंपनी चा बॉस बायको मुला सह आला, छान फोटो काढले अन हातात

एक पॉकेट गिफ्ट दिले, छान रंगीत पॉकेट त्यावर with best compliments from म्हणून कंपनीचे आणि

आमचेही नाव. लग्नात आहेराची पॉकेट खूप आली पण यात काय असेल याची उत्सुकता बायकोला खूप 

लागली होती कारण ते तिच्या कंपनी तर्फे आले होते, बॉस गेल्यापासून ते पॉकेट कधी फोडू न कधी नाही अस 

झालं होत, 2 -3 वर्ष कंपनी मध्ये काम केलेले असल्याने अन एक सेँसियर कर्मचारी म्हणून ओळख 

असल्याने बॉस ने नक्कीच काही तरी खास गिफ्ट दिल असेल असे तिला वाटत होते, त्यात पैशापासुन ते 

गिफ्ट vouchar, विमान तिकीट, टूर पॅकेज असे काय काय तिचे अंदाज होते. लग्नानंतर चार दिवस गेले अन 

सर्व कुटुंब एक दिवस कोणी कोणी काय  गिफ्ट दिले हे फोडत बसलो, ते पाकीट तिने खास जपून ठेवले अन 

सर्वात शेवटी उघडायचे म्हणून राखून ठेवले. अखेर तो क्षण आला अन ते पॉकेट हळूच उघडले , आणि आतून 

जे निघाले ते खरच स्पेशल होते,  28 पानाचे ते एक बिल होते ,  ते वाचू लागलो तर त्यावर फक्त माझ्या 

मोबाईलला मागील 4 महिन्यात किती कॉल कंपनीच्या फोन वरून गेले त्याचा मिनिट, तारिख , वेळ अन 

त्याचे किती बिल आले त्याचा तपशील होता, शेवटच्या पानावर एकूण बिलाची रक्कम होती 26 हजार 978 रु

फक्त !!!!   त्या वर paid चा शिक्का अन हेच आमचे गिफ्ट , आहेर असा हाताने लिहिलेला शेरा होता,

आज हि कोणत्या ही लग्नाला गेलो अन आहेराची वेळ आली कि हा किस्सा आठवतो अन हसायला येत.

Prashant Joshi


No comments:

Post a Comment